राजेशाही प्रतिष्ठान
सिन्नर
॥ सोहळा सार्वभौम स्वराज्याचा ॥
शिवभक्त युवकांचे एकत्रीकरण आणि समाजसेवा
आमच्याबद्दल
राजेशाही प्रतिष्ठान, सिन्नर
राजेशाही प्रतिष्ठान ही केवळ एक संस्था नसून, ती समाजासाठी जगण्याची प्रेरणा आहे. सेवेची भावना, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीचा विचार या मूल्यांवर उभी असलेली ही संस्था सातत्याने समाजोपयोगी कार्य करत आहे. महापुरुषांच्या जयंती उत्सवांचे आयोजन, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, तसेच गरजू घटकांसाठी मदतीचा हात — हीच आमच्या कार्याची ओळख आहे.
आमचे धोरण
“महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करून युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करणे, आरोग्य, शिक्षण व सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात कार्य करणे, आणि "समाजासाठी काहीतरी देणे" ही भावना प्रत्येक नागरिकात रुजवणे.”
आमचे ध्येय
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचवून सुसंस्कृत, सशक्त, आरोग्यसंपन्न व जागरूक समाज निर्माण करणे हेच राजेशाही प्रतिष्ठानचे मुख्य ध्येय आहे.
राजेशाही प्रतिष्ठान, सिन्नर
॥ सोहळा सार्वभौम स्वराज्याचा ॥
२०१३
स्थापना वर्ष
१३+
वर्षांचा प्रवास
१९
फेब्रुवारी - शिवजयंती
५०+
सामाजिक उपक्रम
सामाजिक बांधिलकी
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचवून सद्भावना रुजवणे.
संस्कृती जतन
महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार आणि मराठी संस्कृतीचे जतन व संवर्धन.
युवा नेतृत्व
युवकांना सामाजिक नेतृत्वासाठी घडवणे आणि एकत्रित आणणे.
आरोग्य व शिक्षण
आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे व शैक्षणिक उपक्रमांद्वारे समाजसेवा.
कार्यकारिणी
दरवर्षी नवनिर्वाचित कार्यकारिणी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे नियोजन व आयोजन करते
शिवजन्मोत्सव सोहळा समिती २०२६

अभिषेक गडाख

मधुर कपोते
आकाश गवळी

कृष्णा वारुंगसे

रवींद्र रेवगडे
यश भडांगे
निखिल कानडी
दरवर्षीचे उपक्रम
राजेशाही प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित केलेले विविध कार्यक्रम व उपक्रम

पाद्यपूजन व भूपूजन सोहळा
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजेशाही प्रतिष्ठानच्या वतीने पाद्यपूजन व भूपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

श्री गोंदेश्वर महादेव नगर प्रदक्षिणा
श्री गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने सिन्नरचे आराध्य दैवत प्रभू श्री गोंदेश्वर महादेव यांच्या पारंपरिक मुखवट्याची भव्य "नगर प्रदक्षिणा" आयोजित करण्यात आली आहे.

Folk प्रबोधन कार्यक्रम
लोककलेचा सोहळा! पारंपरिक वाद्यांचा निनाद, पारंपरिक कलावंतांची दमदार सादरीकरणे आणि संस्कृतीचा अभिमान जागवणारा अविस्मरणीय सोहळा!
आमचा प्रवास
२०१३ पासून सिन्नरच्या सामाजिक जीवनात सक्रिय योगदान
शिव जन्मोत्सव २०२६ व भविष्याची दिशा
राजेशाही प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव सोहळा समिती २०२६. तालुक्यातील प्रत्येक गावात राजेशाही प्रतिष्ठानचे नाव पोहोचवणे, युवकांना सामाजिक नेतृत्वासाठी घडवणे आणि आरोग्य, शिक्षण, पर्यावरण क्षेत्रात व्यापक कार्य करण्याचा संकल्प.
ऐतिहासिक शिवजन्मोत्सव
ऐतिहासिक शिवजन्मोत्सव २०२५ ची नवनिर्वाचित कार्यकारिणी.
भव्य पाळणा सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रथमच रात्री भव्य पाळणा सोहळा आयोजित.
दशकपूर्ती
राजेशाही प्रतिष्ठानच्या १० वर्षांच्या प्रवासाची भव्य दशकपूर्ती. राष्ट्र उत्सव - शिवजन्मोत्सव सोहळा.
नवीन उंची
प्रतिष्ठानच्या कार्याने नवीन उंची गाठली.
पुनरागमन
कोविड नंतर पुन्हा उत्साहाने शिवजयंती साजरी.
गॅलरी
राजेशाही प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांचे फोटो, व्हिडिओ आणि रील्स


